राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाकरी शरद पवार म्हणाल्या प्रमाणे फिरवली आणि कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर झाले. आपण त्याबाबत समाधानी आहोत,अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूमिका मांडत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला होता.
आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप अजित पवारांनी घडवून आणला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी दुपारी 2.30 वाजता राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.यामुळे राज्याला आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार वगळता सर्वांनीच त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता.तेव्हापासूनच अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती. शरद पवार यांनी पक्षांतर्गत विरोधानंतर निर्णय़ मागे घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली इच्छा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं असून, आपल्याकडे पक्षांतर्गंत इतर जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी1 जुलैपर्यंत अल्टिमेटमही दिला होता. यानंतर अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते.आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली,अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ८ जणांनी मंत्रिपदाचा शपथविधी राजभवनात पार पडला.
- छगन भुजबळ
- दिलीप वळसे पाटील
- हसन मुश्रिफ
- धनंजय मुंडे
- धर्माराव आत्रम
- आदिती सुनील तटकरे
- संजय बाबुराव बनसोडे
- अनिल पाटील
