महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता उभी फूट पडली आहे.अजित पवारांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
खरं तर, अलीकडेच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाब टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघंही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील.
‘या’ आमदारांनी घेतली मंत्रिमंडळाची शपथ
अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
धर्माराव अत्राम
आदिती तटकरे
संजय बनसोडे
