आम्ही जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करत आहोत; प्रफुल्ल पटेलांनी जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद घेतलं काढून

राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढणार असल्याचे चित्र आज दिसून आले. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फे केले तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्याचवेळी अजित पवार यांनी नऊ जणांना पाठवलेल्या नोटीससंदर्भात भूमिका मांडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही लढाई कायद्याची लढाई होणार आहे.

अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त कऱण्यात येत आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील, असे प्रफुल पटेल म्हणाले. राष्ट्रवादीचे संघटनात्मक धोरण प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. संघटनात्मक दृष्टीने नियुक्त्या करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पक्षाच्या 21 जूनच्या कार्यक्रमामध्ये पक्षाने अधिकृत रीतीने राष्ट्रीय कार्यकारीणी अध्यक्षाची जबाबादारी दिली होती. सप्टेंबर 2022 मध्ये पक्षाच्या अधिवेशनमध्ये पक्षाच्या संघटनात्मक नियुक्ती मी जाहीर केल्या होत्या. यावेशळी जयंत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्रा प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली होती असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाडांची विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्ती वैध की अवैध? याबाबत अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे.पवार म्हणाले, मी अनेक वर्षे विधीमंडळ सदस्य म्हणून काम केलं आहे. विरोधीपक्ष नेतेपदी कोणाची नियुक्ती करायची याचा अधिकार कुठल्याही पक्षाला नसतो. तर ही नियुक्ती विधानसभा अध्यक्षांकडून केली जाते. तसेच विरोधीपक्षांमध्ये ज्यांची संख्या जास्त त्या पक्षाचा नेता विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्त केला जातो.

“सुनील तटकरे यांनी अध्यक्ष झाले आणि काही निर्णय घेतले. विरोधी पक्ष नेता नेमण्याचं काम विधानसभा अध्यक्ष यांचं असत. जास्त सख्या असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता पद मिळतं. मात्र, आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत” असं यावेळी पवार म्हणाले.