ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणं अनेकांसाठी धक्कादायक आहे. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्या पक्षांतरावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती संजय राऊत यांच्यासारखे दलाल आहेत. सुषमा अंधारेंसारखे लोक आहेत. म्हणून नीलम गोऱ्हेंसारखे निष्ठावंत पक्ष सोडून जात आहेत, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून संजय राऊत ही संपलेली व्यक्ती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात राऊतांनी काड्या लावल्या. आता ते शरद पवारांच्या घरात काड्या लावण्याचे काम करीत आहेत,” असे राणे म्हणाले. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून आज ‘राजकारणातील संतपरंपरा’वर भाष्य करत भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. त्यावर नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला. राणे म्हणाले ‘सामना’चा आजचा अग्रलेख संत परंपरेवर लिहिला आहे. पण नाईट लाईफचे संत नेमके कोण आहेत ?, अशा शब्दात राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुंबई लुटणारेच अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत. बाळासाहेबांच्या घरात काड्या लावल्या. त्याच शरद पवारांच्या घरात काड्या लावण्याचे काम संजय राऊतने केलं आहे.असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
