विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाला नोटीशा पाठवल्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी अपात्रतेचा निकालाचा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या 40 तसेच ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहेत. यासंदर्भात बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, ही नोटीस दिली म्हणजे आम्ही पक्ष सोडून गेलो म्हणून कारवाई होत आहे, पण सुप्रिम कोर्टात गेल्यामुळे ही नोटीस आली नाही, हे यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या नोटिशीला उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत भरत गोगावलेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी ७ जुलै २०२३ रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आम्हाला नोटीसा काढलेल्या आहेत अशी माहिती दिली. तर आता आम्हाला २७ जुलैपर्यंत नोटीसांना उत्तर देण्यास सांगितले आहे. शुक्रवारी ती काढली सोमवारी ती आम्हाला प्राप्त झाली. कायदेशीर सल्ला मसलत करण्यासाठी आम्ही मुदतवाढ मागणार आहोत असं शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
“या नोटीशीवर पक्षाचे वकील उत्तर देणार आहेत. परंतु, त्यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे उत्तर देण्याकरता मुतदवाढ आम्ही मागून घेणार आहोत. अध्यक्ष आमच्या विनंतीचा मान ठेवून मुदतवाढ देतील. त्यामुळे वाढवून दिलेल्या तारखेच्या आत आम्ही कायदेशीर उत्तर देऊ”, असं संजय शिरसाट यांनी पुढे स्पष्ट केलं.“परंतु, ही नोटीस प्राप्त झाली म्हणजे कोणी सर्वोच्च न्यायालयात गेल्याने हे घडलं आहे, असं होत नाही”, असं म्हणत संजय शिरसाटांनी ठाकरे गटावर टोला लगावला आहे.
