राजकीय विरोधकांवर बेतालपणे टीका करायची मात्र समोर स्वार्थ दिसला की पायाशी लोटांगण घालून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवरच कलंक लावला.
बोलात बोल नसणे, शब्द फिरविणे, विरोधकांवर गरळ ओकणे हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव. शरद पवार दुःशासन आहेत, धृतराष्ट्र आहेत, अशी जहरी टीका त्यांनी केली होती. राजू शेट्टी यांना आश्वासन देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पांडवांमध्ये कधी दुःशासन, धृतराष्ट्र येईल का? नशीब महाभारतावेळी पवार नव्हते. त्यांनी तिथे सुद्धा पुढे केली असती.
