राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली आहे.
राज्य मंत्रीपद मिळण्याची शक्यता असणाऱ्या आमदारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोन गेल्याची चर्चा आहे. कडू यांनीही या चर्चांना दुजोरा दिला. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला फोन आलेला आहे. आज 11 वाजत मंत्रीमंडळात सामील व्हायचे की नाही याबाबत माझी भूमिका मी जाहीर करणार आहे. त्यांनी मला फक्त फोन करून बोलावलं आहे. विस्ताराबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत 11 वाजता मी भूमिका जाहीर करणार आहे. असे कडू म्हणाले.मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर सातत्याने नाराजी व्यक्त करणारे आमदार बच्चू कडू आरपारच्या मूडमध्ये आले होते. आज सकाळी 11 वाजता आपण पुढील वाटचालीसंदर्भात भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले.आता ते काय निर्णय घेणार याकडे राज्याच्या जनतेचं लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री शिंदेंना भेटून 18 जुलैला भूमिका जाहीर करणार
आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले की, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या विनंतीनुसार मी मविआला पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिल्याने मी मंत्री झालो. मविआ काळात दिव्यांग मंत्रालय झालं असतं तर शिंदेंसोबत मी गेलो नसतो. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मंत्रिपदाचा दावा मी सोडणार होतो पण मुख्यमंत्र्यांचा फोन आला आहे. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. 17 तारखेला मी शिंदेंना भेटणार आहे. त्यानंतर 18 तारखेला मी माझी भूमिका मांडणार आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर सातत्याने नाराजी व्यक्त करणारे आमदार बच्चू कडू आरपारच्या मूडमध्ये आले होते. आज सकाळी 11 वाजता आपण पुढील वाटचालीसंदर्भात भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू असून अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. यामुळे बच्चू कडू नाराज झाल्याचे बोलले जात होते. पण मुख्यमंत्री शिंदेंसोबत झालेल्या बोलणीनंतर 18 जुलै रोजी आपण निर्णय जाहीर करणार असे कडू यांनी म्हटले आहे.
