उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणून अजिदादांसोबत शपथविधी झाला असे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. खूपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची पोलखोल केली. ते म्हणाले, ज्यावेळी उद्धव ठाकरे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्हाला अजित पवारांना बरोबर घेऊन शपथ घ्यावी लागते. नाहीतर उद्धव ठाकरेच यशस्वी होतील. पाठीत खंजीरच यशस्वी होईल. माझ्या पाठीतला खंजीर काढून मी ताठ उभा राहू शकतो, तुमचा मुकाबला करू शकतो, तुम्हाला घरी पाठवू शकतो, हे दाखवून द्यावे लागते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजही माझे उद्धव ठाकरेंना, त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि एनसीपीच्या ट्रॉलर्सला माझे ओपन चॅलेंज आहे की माझ्याबद्दल तुमच्याकडे एक गोष्ट असेल तरी समोर आणा.
