उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे अभ्यासू, कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व -माजी खासदार संजय काकडे

भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कार्यकाळात बरेच चढउतार आले.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे अभ्यासू, कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होय. आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल थोडंसं सांगावं वाटतं असं संजय काकडे बोलत होते

काकडे पुढे बोलताना म्हणाले माझा आणि त्यांचा परिचय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी झाला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्यामुळं फडणवीस साहेबांशी ओळख झाली. आमच्यातली मैत्री निखळ आणि स्वच्छ आहे. जसं आहोत तसं आम्ही एकमेकांना स्वीकारलं आहे. 2014 व 2019 च्या पुणे लोकसभा व शहरातील आठ विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला महत्वाची भूमिका बजावता आली. विशेषतः 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरुड विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विजयासाठी मी काम केले व विजय मिळवून दिला.

‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा झाल्यानंतर 2014 मध्ये महाराष्ट्राचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली.फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग,मुंबईतील कोस्टल रोड, जलयुक्त शिवार योजना व वृक्ष संवर्धन, मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी मेट्रोचं जाळं,समान पाणी पुरवठा योजना, पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ, चांदणी चौकातील उड्डाणपूल,कात्रज-कोंढवा रस्ता, स्मार्टसिटी अशा अनेक योजना गतिशीलपणे राबवल्या गेल्या.फडणवीसांच्या तळमळीनं काम करण्याच्या वृत्तीचा आणि अभ्यासूपणाचा उपयोग महाराष्ट्राच्या कल्याणासाठी होवो.त्यांच्या हातून राष्ट्राची-महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो!