हिंमत असेल तर अजितदादा यांना गद्दार म्हणून दाखवा – उदय सामंत

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे गट आणि भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर शिंदे गटाला गद्दार म्हणणं अचानक बंद झालं आहे. त्यावरून राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. हिंमत असेल तर अजित पवारांना गद्दार बोलून दाखवा. अजितदादा आमच्यासोबत आल्यापासून गद्दार बोलणं बंद झालं आहे. त्याबद्दल मी अजितदादांचं आभारच मानतो, असं सांगतानाच अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे काल काही लोक बुके घेऊन त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आले होते, असा चिमटाही उदय सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.

उदय सामंत म्हणाले की, अरविंद सावंत काय किंवा यशोमती ठाकूर काय किंवा संजय राऊत काय ज्या पद्धतीने टीका करतात, आम्हाला वाटते यांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे. त्यांना सरकार ज्या पद्धतीने काम करते ते पाहवत नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन फार मोठा आहे. ही गोष्ट खरी आहे की, त्यांनीच शिफारस केली होती आणि त्यासाठी जर आरोप-प्रत्यारोप होत असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे.

संजय राऊत यांच्या बोलण्यामध्ये कुठलेही तथ्य नाहीये. ते विरोधात बसतात म्हणून काहीतरी बोलणं त्यांना भाग आहे. ते बोलत राहतात आम्ही ऐकत राहतो, असा टोलाही त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन फार मोठा आहे. ही गोष्ट खरी आहे की, त्यांनीच शिफारस केली होती आणि त्यासाठी जर आरोप-प्रत्यारोप होत असेल तर त्याला काही अर्थ नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच हे सरकार लोकांचं आहे. गतिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड येथे दीड तास पायी चालत गेले. त्यावर हे लोक काही बोलत नाही.