उद्योग राज्याबाहेर गेल्याबाबत अधिवेशनात येणार श्वेतपत्रिका; उदय सामंत सादर करणार श्वेतपत्रिका

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातून मोठे उद्योग राज्याबाहेर का गेले, याबाबत सरकरकडून या अधिवेशनात श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे ही श्वेतपत्रिका सादर करणार आहेत.राज्यातून वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले? याबाबतची श्वेतपत्रिका उद्योगमंत्री उदय सामंत सादर करणार आहेत. विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उद्योग खात्याने लेखी उत्तर देत ही माहिती दिली आहे.

१३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातून वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी राज्य टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. एवढे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हाताबाहेर का जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत होता.१५ सप्टेंबर रोजी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले होते की, टाटा-एअरबस प्रकल्प मिहानमध्ये आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प हाताबाहेर गेल्याच्या ४८ तासांनंतर त्यांनी हे विधान केले होते, मात्र तो प्रकल्प देखील गुजरातला गेला.

याबाबत ६ महिन्यांपूर्वीच उद्योगमंत्र्यांनी घोषणा केली होती. सभागृहात येताच मंत्री उदय सामंत यांनी वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले याची श्वेत पत्रिका सादर करणार आहेत.