राज्यात आता पोलीस ठाणे वाढणार, नवे १८ हजार पोलीस पदे भरणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसयांची घोषणा

राज्यात आगामी वर्षभरात १८ हजार ५५२ पोलिसांची पद निर्माण होणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी २९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे बाबत विरोधकांनी २९३ अंतर्गत कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्याची विनंती केली होती. यावेळी विरोधकांनी राज्यातले अनेक विषय समोर आणले होते. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले , “राज्यात पोलीस दलाचा नवा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. ६० वर्षात आज पर्यंत १९६० चा आकृतीबंध होता. लोकसंख्या वाढली तरी १९६० च्या लोकसंखेनुसार पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या होती. हे पाहता पोलीस स्टेशन वाढवणं, पद वाढवणे याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल सरकार ने मान्य ही केला आहे. या अहवालानुसार किती लोकसंखेमागे एक पोलीस स्टेशन असेल? किती लोकांच्या मागे एक पोलीस असेल? हे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार राज्यात १८ हजार पोलीस आणि अधिकारी लागणार असल्याचाी माहिती फडणवीसांनी दिली.