पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. १५व्या ब्रिक्स परिषदेत सामील होण्यासाठी ते जोहान्सबर्ग येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांनी परिषदेला संबोधित केले आणि भारतीय अर्थव्यवस्थेने केलेल्या विकासाची माहिती दिली.भारताने आपत्ती आणि अडचणीच्या काळाचे रुपांतर आर्थिक रुपांतरासाठी कसा केला, याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले. भारत हे जगाच्या विकासाचं इजिन असल्याचे वक्तव्य त्यांनी ब्रिक्सच्या परिषदेत केले.
आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. १०० पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारतामध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स काऊन्सिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षही उपस्थित होते. विशेष म्हणजे जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट झालेले नाही. 3 मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले – डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत भारत अव्वल आहे. ब्रिक्स देशांना आर्थिक आघाडीवर सहकार्य करावे लागेल. भारत लवकरच 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल आणि आपण जगाचे ग्रोथ इंजिन बनू. भारताने व्यवसाय सुलभ करण्याच्या क्षेत्रात प्रचंड सुधारणा केल्या आहेत. मी ब्रिक्स देशांतील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो.
ऑनलाईन व्यवहारांबद्दल मोदी म्हणाले की, “भारतामध्ये यूपीआयचा वापर सर्व स्तरांवर होत आहे.आज जगातील सर्व देशांपैकी भारत हा सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश आहे. “
