ब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. विभागातील प्रलंबित प्रश्न आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होण्याची शक्यता आहे. छ.संभाजीनगर येथे ही बैठक होणार असून, 16 सप्टेंबर रोजी ही बैठक होण्याची शक्यता आहे. याबाबत शासनाकडून यासाठी तोंडी निरोप आला असून, आठवड्याच्या अखेरीस नियोजनाचे पत्र येणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2016 रोजी छ.संभाजीनगरमध्ये मंत्री मंडळाची बैठक पार पडली होती.
2008 साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छ.संभाजीनगरमध्ये मंत्री मंडळाची बैठक झाली होती. त्यानंतर आता तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक 16 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात या वर्षी पावसाने मोठी ओढ दिली आहे. जूनपासून आतापर्यंत ५० दिवस कोरडेच गेले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे संकट आहे. याबाबत उपाययोजना, पीक नुकसानीचे पंचनामे, लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण याबाबतची कामे प्राधान्याने करा. मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्त्यांनी दिल्या.
येत्या 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे राज्य मंत्री मंडळाची बैठक होण्याचे संभाव्य नियोजन आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे प्रस्ताव तयार करावे. लागणाऱ्या निधीबाबत माहिती द्यावी. जिल्ह्याचा आणि विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव तयार करुन सादर करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी विभागातील सातही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत दिले आहे. यंदा मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या पूर्वसंध्येला 16 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरात घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यात दुष्काळाची झळ सोसणाऱ्या या विभागाला मदतीसह येथील रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
