दहीहंडीचा उत्सव जवळ येतो आहे. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम शिंदे फडणवीस सरकारने मंजूर केली आहे. 8 सप्टेंबर 2023 पर्यंत शासकीय विमा कवच लागू असणार आहे. गोविंदाबाबत राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त 25 हजार गोविंदाना राज्य सरकारने विमा कवच दिलं आहे. याआधी 50 हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याचे ठरवले होते. त्यात 25 हजार गोविंदांची भर पडल्याने आता एकूण 75 हजार गोविंदांना या विम्याचं कवच मिळणार आहे. प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडीसाठी राज्य सरकारने गोविंदांना दिले शासकीय विमा कवच दिले आहे.
गेल्यावर्षी 50 हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आलं होतं. पण आता ही संख्या वाढवून 75 हजारांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच, राज्यभरातील 75 हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त 25 हजार गोविंदांना राज्य सरकारनं विमा कवच दिलं आहे. 2014 पासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार अशी मागणी होती, ती यंदा पूर्ण होत आहे. वरळी येथे डोम थिएटरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये “प्रो-गोविंदा” स्पर्धेचं आयोजन राज्य समन्वय समितीद्वारा करण्यात येणार आहे, या समितीस शासनाने मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. यासंबंधीच्या निर्णयानुसार, गोविंदांना राज्य सरकारने खेळाडूंना नोकऱ्यांत दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचाही लाभ मिळणार आहे. दहीहंडीत गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख, तर गंभीर जखमींना 7.50 लाखांची मदत केली जाईल. याशिवाय हात-पाय जायबंदी झालेल्यांनाही 5 लाखांची मदत केली जाणार आहे.राज्यात 2014 पासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी सुरू होती. ती यंदा पूर्ण झाली आहे. वरळी येथील डोम थिएटरमध्ये 31 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य समन्वय समितीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या समितीला शासनाने मान्यता दिली आहे.
