सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार; सायरस पुनावाला यांची घोषणा

देशभरात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच दरम्यान आता सीरम इन्स्टिट्यूटने एक मोठी घोषणा केली आहे. डेंग्यूच्या उपचारासाठी आवश्यक अशी लस वर्षभरात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांनी केली आहे.सायरस पूनावाला यांनी डेंग्यूवरील लस उपलब्ध करुन देण्याची मोठी घोषणा केली आहे. सायरस पूनावाला म्हणाले, वर्षभरात आम्ही डेंग्यू उपचार आणि डेंग्यूवरील लस विकसित करु. भारतात आणि आफ्रिकेन देशांमध्ये या लसीची नितांत गरज आहे. जेथे लाखोंच्या संख्येत नागरिकांना या आजाराची लागण होत आहे.

पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरिया रोगांचा लाखो लोकांना प्रादुर्भाव होतो, डेंग्यूमुळे काही लोक दगावलेही जातात. त्यामुळे अनेक वर्षापासून सीरम इस्टिट्युटचे शास्त्रज्ञ या रोगांवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते.या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात आता यश आलंय.सीरमचे शास्त्रज्ञ डेंग्यू आणि मलेरिया बरोबरचं कर्करोगावरही संशोधन करत आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

“कोविड लशीच्या यशानंतर आम्ही डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार आहे. या लसीची नितांत गरज आहे. आफ्रिक देशात आणि भारतात डेंग्यू आणि मलेरियाची साथ कायम येते. यावर उपाय आहेत मात्र ठोस अशी लस नाही त्यामुळे आम्ही ही लस तयार करणार आहोत,” असं पुनावाला यांनी म्हटलं आहे. सायरस पुनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणणार असल्याची घोषणा केली. या लसीमुळे डेंग्यूचे चारही प्रकार बरे होण्याची खात्री असेल. सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. काही लसींमुळे महिलांच्या गर्भाशयावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी ही लस असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.