शेतीविषयक धोरण ठरवलं गेलं तर आरक्षणाची गरज भासणार नाही – बचू कडू

मराठा समाजाला आरक्षण देण्याची साधी, सरळ, सोपी गोष्ट होती; ती आता अवघड करून ठेवली गेली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या किंवा ओबीसी म्हणून द्या नाही तर कुणबी आहेत, असे समजून परिपत्रक काढायला काहीच हरकत नाही, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतीविषयक धोरण ठरवले गेले, तर आरक्षणाची गरजही भासणार नाही, असेही ते म्हणाले.

दिव्यांग कल्याण व समाजकल्याण विभागाच्यावतीने नगरमध्ये, मंगळवारी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आ. कडू उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. आ. कडू म्हणाले आमच्या वाडवडिलांच्या महसुली कागदपत्रात कुणबी नोंद आहे, त्याआधारे आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही. आरक्षण शिक्षण आणि नोकर्‍यांसाठी महत्त्वाचे आहे, सर्वांना शिक्षण मोफत मिळाले. शेतीवर भर दिला.गावातील तरुणांना ताकद दिली तर तो तुमच्याकडे आरक्षण मागायला येणार नाही. आरक्षण फेकून देईल असेही त्यांनी सांगितले.

आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे, सर्वाना शिक्षण मोफत मिळाले. शेतीवर भर दिला. गावातील तरुणांना ताकत दिली, तर तो तुमच्याकडे आरक्षण मागायला येणार नाही. आरक्षण फेकून देईल, असेही त्यांनी सांगितले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर भंडारा उधळणाऱ्यांना मारहाण झाली, याकडे लक्ष वेधले असता आमदार कडू म्हणाले, की आंदोलकांना गुन्हे दाखल होणे नवीन नाही. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. माझ्यावर ३५० गुन्हे आहेत. पोलिसांच्या काठीने आमचे पाय तुटले. आंदोलन म्हटले की हे होणारच. तुम्हाला कोणी आंदोलन केले म्हणून पुरणपोळी देणार नाही. हे सहन केले पाहिजे.