येत्या 48 तासांत ‘या’ भागात कोसळणार परतीचा पाऊस

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पाऊस झाला मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मात्र आता परतीच्या पावसाचं आगमन होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक राज्यांसह महाराष्ट्रात देखील मान्सून परतल्याने उष्णता वाढली आहे.देशामध्ये अनेक राज्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झाल्यानंतर आता 12 ऑक्टोबरनंतर देशातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असा इशारा भारतीय हवामा विभागाने दिला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या भागांमध्ये येत्या 24 तासांत पावसाची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांत विविध राज्यांतून नैऋत्य मान्सून माघारीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडी च्या माहितीनुसार, पुढील 2 दिवसांत पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेचा पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रातील काही भागांमधून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये थंडीची चाहूल लागली होती. पण, आता मात्र या भागांमध्ये पावसानंही हजेरी लावल्यामुळं मैदानी भागांमधील तापमानाच काही अंशी घट झाल्याचं पाहायला मिळू शकतं. तर, पर्वतीय भागांमध्ये पारा बराच खाली जेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिलगिट, बाल्टिस्टान आणि जम्मू काश्मीरमध्ये काही प्रांतांवर हिमवर्षावही होऊ शकतो.

देशाच्या दक्षिणेकडे आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि लक्षद्वीपमध्ये पावसाच्या हलक्या सरी असतील. तर, केरळच्या किनारपट्टी भागात हवमान दमट राहील. देशातील इतर राज्यांमध्ये तुलनेनं हवामान कोरडच असणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून मान्सून पूर्णपणे बाहेर पडला आहे. तसे पाहता यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी बसरला. सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला.