शरद पवारांचे मतांच्या राजकारणासाठी दहशतवाद्यांना समर्थन; बावनकुळे यांचा गंभीर आरोप

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मोदींवर टीका करतात. त्या ठिकाणी ते पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलतात. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी दशहतवाद्यांचे समर्थन करतात. असा थेट आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी मोदींवर जी टीका केली मी त्याचा निषेध व्यक्त करतो अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

बावनकुळे हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, ,गेल्या नऊ वर्षांत मोदींनी देशाला जगातील सर्वोत्तम भारत करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आतापर्यंत ,३२ हजारांहून अधिक नागरिकांना भेटलो, त्यांतील १३ लोक सोडले तर सर्वांना मोदी पंतप्रधान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या देशातील ,महाराष्ट्रातील नव्वद तक्के जनता मोदींच्या पाठीशी आहे. मला वाटतं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महायुतीचे खासदार ५१ टक्के मताने निवडून येतील असा मानस बावनकुळे यांनी बोलून दाखवला आहे.

पंतप्रधान यांच्या योजना नागरिकांपर्यंत संपर्क ते समर्थन म्हणजे संपर्क करायचा आणि समर्थन मागायचे. आम्ही जेव्हा १९ डिसेंबरपर्यंत नागरिकांपर्यंत पोहचू तेव्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून ५१ टक्के मतदान मोदींच्या नेतृत्वात मिळतील असेही बावनकुळे म्हणाले आहेत.