उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत युती करणार होते, त्यांनी नाही केली,म्हणून आम्ही निर्णय घेतला; दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले. तुम्हाला भाजप सोबत यायचं होत,पण तुम्ही नाही आलात, मग आम्हाला निर्णय घ्यावा लागला. कोकणावर एवढं अन्याय होत असताना आम्ही बाळासाहेबांना प्रेम दिलं, विश्वास दिला त्यांची पूजा केली. बाळासाहेब.ठाकरे यांच्यासोबत संपूर्ण कोकणातली जनता उभी राहिली. उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेऊन सुद्धा काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे कुठेतरी बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवायचा होता. म्हणून आम्ही निर्णय घेतला असा गौप्यस्फोट शालेय शिक्षणमंत्री दीपक.केसरकर यांनी केला आहे.

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे.

यावेळी केसरकर म्हणाले की, राष्ट्रवादी सोडण्याआगोदर मला भाजपमध्ये जाण्याची इच्छा होती. तो प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र तो सोडून मी शिवसेनेत आलो. भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी ही माझी देखील इच्छा होती. शिवसेनेनं मला मंत्रीपद दिले म्हंजे उपकार केले अस नाही. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट देखील मीच करून दिली. शिवाय उद्धव ठाकरे यांनी.हे कबूल देखील केलं आहे की, मुंबईत आल्यावर युतीची पूर्नस्थापणा करून तुम्ही त्यांनाच फसवताय. म्हणजे तुम्ही जर भाजपबरोबर गेला असता आणि तुम्ही युती स्थापन केली असती तर ते योग्य. तुम्ही कबूल करून नाही केलं. म्हणून आम्ही आमचा निर्णय घेतला.त्यामध्ये आमचं चूक काय.याच उत्तर त्यांनी दिल पाहिजे. अशी अपेक्षा.केसरकर यांनी व्यक्त केली.