मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली अल्टिमेटम संपला आहे, म्हणून मनोज जरांगे यांनी एकदम युद्ध पातळीवर येऊ नये, मराठा आरक्षणाला वेळ लागू शकतो,त्यामुळे जरांगे यांनी घाई करू नये असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
जळगाव.येथे माध्यमांशी.बोलताना त्यांनी हे आवाहन केले आहे. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, मराठयांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे.पाटील यांनी आपली.भूमिका मांडली आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडून मराठा समाजाला टिकनारे, शाश्वत असे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी समिती देखील देखील गठित करण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षण मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे जारंगे पाटील यांनी एकदम वॉर लेव्हलवर , हातघाईवर येऊ नये, असे महाजन म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांच्याकडून सरकाराला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र ती मुदत संपली आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेर्तृत्वात सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने समिती नेमली आहे. ही समिती रात्रंदिवस काम करत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
