एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री असतील; ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नेतृत्वात राज्य विकास करत असून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तसेच ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. एखादा व्हिडिओ पडला म्हणून विश्लेषणाची गरज नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या काळातच पुढील निवडणुका होणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले.

भाजपने ट्विट केलेल्या एका व्हिडिओ मुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र त्यावर आता फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ११० आमदार आहेत तर मात्र जर माझ्याकडे असे आमदार असते तर मी नव सरकार बनवल असते. त्यावर फडणवीस यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार, तेच आमचे मुख्यमंत्री राहणार आहेत. पंतप्रधनानी शरद पवार यांचा धसका घेतला म्हणून पवार यांच्यावर त्यांनी टीका केली. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या नेतृत्वात ३०५ खासदार निवडून येतात. आणि ४ खासदार निवडून आणणाऱ्या नेतृत्वाचा धसका घेतील ? असे बोलण हे हास्यास्पद असल्याचे फडणवीस म्हणालेत.