राज्यभर मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे.. त्यावर तोडगा काढण्याची राज्य सरकारमधून रात्रभर हालचाली सुरू होत्या. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या बैठकीत आरक्षणासंदर्भात विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावर तिन्ही.पक्षांचे एकमत झाले असल्याचे देखील समोर येत आहे.
या संदर्भात आज ( मंगळवारी) महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्राबाबत शिंदे समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणबाबात अध्यादेश निघण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अधिवेहांवर देखील निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात भाजपच्या कोआर कमिटीची देखील बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
या अध्यादेशाला कोणतीही अडचण येणार नसल्याचे देखील बोलले जात आहे. या अध्यादेशाला विरोधकांचा देखील पाठींबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे आजच्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
