राज्यातील तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतीचा निकाल समोर येत आहे.जसजसे गावागावात जल्लोष सुरु झाला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सध्या निकालाचे कल पाहता सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय. तर २ नंबरला राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. तीन नंबरला शिंदे उद्धव ठाकरे गट आहे आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गट, तर पाचव्या क्रमांकावर ठाकरे गट आहे. प्रत्येक पक्षानं आपआपल्या विजयाचे वेगवेगळे आकडे सांगून दावे केलेत.
महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी ही निवडणूक झाली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने चांगलंच वर्चस्व मिळवलं आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.
शिवसेनेतूनही एकनाथ शिंदे बाहेर पडत त्यांनी आपला नवीन गट निर्माण केला. निवडणूक आयोगाने त्यांच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता दिली. एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत ही पहिली निवडणूक नव्हती. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची कामगिरी चांगली झाली होती. आता मात्र त्यांनी उद्धव ठाकरे गटाला चांगलेच मागे टाकले आहे. ग्रामीण भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत आल्याचा चांगलाच फायदा झाला आहे.
संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपचे यशपाल वाडकर सरपंचपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसची २५ वर्षांपासूनची सत्ता उलथून टाकत भाजपने सरशी मारली आहे. कासेगावातील 11 पैकी 9 जागांवर भाजपचा दणदणीत विजय तर सरपंच पदावर ही भाजप आहे. काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळाला आहे.
एकूण संख्या- २३५९
भाजपा- २९५
शिवसेना (शिंदे) १५०
ठाकरे गट ५८
राष्ट्रवादी(अजित पवार) २१३
शरद पवार गट- ६२
काँग्रेस- ९२
इतर – 101
महायुती ६६५
महाविकास आघाडी २१६
एकूण संख्या- २३५९
