ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरता विविध मागण्यांसाठी बंद पुकारला आहे परंतु या बंदला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. राज्यभरातील एसटी वाहतूक एसटी सुरु आहे. वर्धा विभागातील सकाळच्या सत्रात 100 टक्के वाहतूक सुरु आहे. कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी सुरु आहेत. माजलगाव आगारातही एसटी बसेस सुरु आहेत. त्यासोबतच ठाणे, पाटोदा, दिग्रस, हिंगोली आणि कळंब आगारातील एसटी बससेवा 100 टक्के सुरु आहे.
जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे, पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार, कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.
