भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालवण इथं आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं उद्धाटन पार पडलं. यानंतर उपस्थितांना आणि विशेषकरुन कोकणवासियांना संबोधित करताना मोदींनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये रत्नागिरी, देवगड, मालवण या किनारी भागांच्या विकासकामांचा समावेश आहे.
मोदी आज पहिल्यांदा कोकण दौरा आहे. त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये राजकोट किल्ला बांधला होता. या किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते आज करण्यात आलं. विशेष म्हणजे आज नौदल दिवस आहे. नौदल दिनाच्या निमित्तानेच आज विविध कार्यक्रमांचं आयोजन सिंधुदुर्गात करण्यात आलं आहे. या नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्याआधी त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. यावेळी मोदींनी मोठ्या घोषणा केल्या.
भारताचा इतिहास शौर्याचा आणि सामर्थ्याचा असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं असतं ते शिवाजी महाराजांनी जाणलं. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं. समुद्रावर ज्याचं वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे शिवाजी महाराजांनी ओळखलं. शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे यांच्यासारखी लोक उभी केली. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला हे शिवाजी महाराजांच्या शक्तीचे प्रतिक असल्याचं मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय, छत्रपती वीर संभाजी महाराज की जय, अशी घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गाचं महत्त्व, तसेच सिंधुदुर्गातील किल्ल्याचं महत्त्व सांगितलं. त्यांनी शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या गौरवाची गाथा सांगितली. त्यानंतर त्यांनी दोन मोठ्या घोषणा केली. नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.
नेव्हलशीपमध्ये देशातल्या पहिल्या कमांडर ऑफिसर नियुक्ती केली आहे. शिवरायांचा वारसांचा पुढे नेत असताना बोट बनविण्याची कला पुन्हा विकसित करण्याची गरज आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर तारकर्लीच्या समुद्रात नौदलाने प्रात्यक्षिके केली.
