कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका वाढला; पुणे, ठाणे शहरात रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, यादरम्यान कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जेएन.१ चे रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी सापडत असल्याने चिंता वाढली आहे. यादरम्यान ठाण्यात जेएन.१ व्हेरियंटचे एकाच दिवशी पाच नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.

देशात जेएन.१ चा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर या व्हेरियंटचे गोव्यात काही रुग्ण आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमधील रुग्ण हा ४१ वर्षांचा पुरूष होता. आता जेएन.१चे आणखी ९ रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक ५ रुग्ण ठाणे महापालिका हद्दीत आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ८ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यात ९ वर्षांचा एक मुलगा, २१ वर्षांची महिला, २८ वर्षांचा पुरूष आणि इतर रुग्ण ४० वर्षांवरील आहेत. केवळ पुण्यात आढळेल्या एका रुग्णाने परदेशवारी केली असून, तो अमेरिकेहून परतल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या जेएन १ चे पुणे शहरात दोन तर पुणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला आहे. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या दहा झाली आहे. या सर्व रुग्णांना नवीन व्हेरियंटची सौम्य लक्षणे होती. त्यांना घरीच विलिगीकरणात ठेवण्यात आले. आता ते बरे देखील झाले आहेत. पुणे शहरातील रुग्ण अमेरिकेतून आला होता. ४१ वर्षीय पुरुषाला कोरनाच्या नवीन व्हेरियंटची लागन झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कोरोनाचे मिळालेल्या दहा पैकी आठ जणांनी लस घेतली आहे. सर्वांचे वय ४० पेक्षा जास्त आहे.

दरम्यान आढळलेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं असून सगळ्यांमध्ये जेएन.१ व्हेरिएंटचे तीव्र लक्षणं नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचं राज्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. देशात कोरोनाच्या नवीन जेएन.१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. तर राज्यात याचा पहिला रुग्ण सिंधुदूर्ग जिल्ह्यात आढळून आला होता. मात्र आता ठाणे आणि पुणे शहरात देखील या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढणल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.