पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, पीक कर्जवसुलीसाठी स्थगिती देण्याचा महसूल विभागाचा निर्णय

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातील पीक कर्ज वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती जाहीर करण्यात आली आहे. 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. तसेच इतर महामंडळांमध्ये 1021 तालुक्यात महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.मात्र आता या भागातील पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्यात आधी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के कमी पाऊस झाला, त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केला गेला. तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील निर्देश देण्यात आलेत.

दरम्यान, केंद्रीय समितीने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून आपला अहवाल सादर केला होता. त्या अहवालावरून शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 6800 रुपये मदत जाहीर केली. आता पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसुली करण्यात येऊ नये. तसेच आगामी खरीप पीक कर्ज तातडीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, असे आदेश शासनाने जिल्हा सहकारी बँक राष्ट्रीय बँकांना दिले आहेत. या आदेशावरून ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे 2015 च्या वसुलीला स्थगिती दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पुनर्गठनाची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी पुढील खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून विविध कार्यकारी सेवा संस्थांना पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव 27 एप्रिलपर्यंत जिल्हा बँकेत सादर करणे गरजेचे आहे.

पुढील जिल्ह्यात स्थगिती
नंदुरबार – नंदुरबार तालुका
धुळे – सिंदखेडा तालुका
जळगाव- चाळीसगाव तालुका
बुलढाणा – बुलढाणा आणि लोणार तालुका
जालना – भोकरदन , जालना ,बदनापूर ,अंबड, मंठा तालुका
छत्रपती संभाजीनगर – सोयगाव, छत्रपती संभाजीनगर , तालुका
नाशिक- मालेगाव , सिन्नर, येवला , तालुका
पुणे – पुरंदर सासवड , बारामती, तालुका , शिरूर घोडनदी , दैड, इंदापूर तालुका
बीड – वडवणी ,धारूर , अंबेजोगाई , तालुका
लातूर – रेणापूर , तालुका
धाराशिव – वाशी , धाराशिव , लोहारा , तालुका
सोलापूर – बार्शी ,माळशिरस , सांगोला , करमाळा,माढा तालुका
सातारा – वाई ,खंडाला ,
कोल्हापूर – हातकंगले, गढहिंगलज ,
सांगली – शिराळा , कडेगाव , खानापूर विटा , मिरज तालुका