भारतीय जनता पार्टीने सुशासन महोत्सव आयोजित केला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे वाइस चेअरमन विनय सहस्रबुद्धे यांनी या बद्दल माहिती दिली. 2 दिवसाच्या या सुशासन महोत्सवाच उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा करणार आहेत. या महोत्सवात 3 राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री मनसुख मंडवीय आणि जम्मू-काश्मीरचे एनजी मनोज सिन्हा सहभागी होणार आहेत. येत्या 9 फेब्रुवारीपासून हा महोत्सव सुरु होणार आहे.
डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटरमध्ये आयोजित या द्विवसीय सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील, असे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या मुलाखती या महोत्सवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मंत्रालये तसेच राज्य सरकारांकडून विविध कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम राबवले जात आहे, त्याचे प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आले आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकारची विविध मंत्रालय, सार्वजनिक संस्था आणि एनजीओ या महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा महोत्सव 2 दिवसांचा असेल. यात एका पुस्तकाच विमोचन होईल. महोत्सवाचा संपूर्ण फोकस पूर्वोत्तर राज्य आणि युवा वर्ग असेल. भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा एका पुस्तकाच विमोचन करतील. विनय सहस्रबुद्धे आणि मुकुल प्रियदर्शी यांनी संपादन केलेल्या लेखांच यामध्ये संकलन आहे. ‘The Art of implementation: as mastered by PM Narendra Modi’ असं या पुस्तकाच नाव आहे.
