राज्यातील मुलींसाठी खुशखबर असून इंजिनिअरिंग, मेडिकलसह 600 अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत मिळणार आहे. ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या जून महिन्यापासून याची अंलबजावणी सुरू केली जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील, यासाठी विशेष अभियान राबवावे, अशा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तसेच सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नियोजित केल्याने यावर्षी एकाही प्रवेश परीक्षेच्या वेळेत बदल करावा लागला नाही, त्याच धर्तीवर विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून निकाल वेळेत जाहीर करावेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. म्हटले की, मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या तब्बल 600 हून अधिक अभ्यासक्रमांना मोफत शिक्षण दिले जाईल.
चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांना या मुलांनी अडवत फक्त मुलींनाच मोफत का, या उत्पन्नाखालील मुलांना देखील मोफत करावे अशी मागणी केली. यावेळी पाटील यांनी तुमची ही मागणी आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन असे आश्वासन दिले.
