सध्या सगळीकडे आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे हे वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच महाविकास आघाडीनंही महायुतीविरोधात एकत्र येत आगामी लोकसभेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने राहिलेले असताना काँग्रेसच्या गटातून मोठी बातमी समोर येत आहे.
गेल्या काही काळापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. आज सकाळी या चर्चांना पुन्हा उधाण आले. त्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात काँग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, ‘आगे आगे देखिए होता है क्या’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंकजा नेत्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांचं अंडरस्टँडिंग पक्कं आहे. त्यांच्या भाषणातील एक-दोन वाक्ये काढून मीडिया दाखवतो. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहील, असं फडणवीसांनी सांगितलं. बिहारमध्ये नेमकं काय चाललंय याची मला माहिती नाही. मी आधी भाजपचा प्रभारी होतो, आता नाही. अलिकडच्या काळात उद्धवजी जे बोलतायत, ते फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. कालच मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, गेट वेल सून.
