राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना
पुन्हा एकदा उधाण आले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांची ओळख आहे. अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यांच्यामध्ये या भेटीवेळी चर्चा झाली. ते सध्या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत.
अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असल्याच बोलल जात आहे. अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा फोन लागत नाहीय. त्यामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलय. भाजपाच्या मुंबई कार्यालयाबाहेर अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. तिथे काही माजी नगरसेवकांचा भाजपात पक्षप्रवेश सुरु आहे.
अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेणार असे दावे यापूर्वीच करण्यात आले होते. जुलै २०२३ मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल दावा केला होता. अशा प्रकारचा दावा करणारे ते एकटे नव्हते. डिसेंबर २०२३ मध्ये नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही अशोकराव चव्हाण भाजपमध्ये येणार असे संकेत दिले होते.अशोक चव्हाण यांच्यासोबत ११ आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहित मिळत आहे.शोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला असून,अशोक चव्हण यांचे नाना पटोले यांच्या सोबत त्यांचे मतभेद असल्याचंही बोललं जात आहे.
