कमलनाथही हातात घेणार कमळ? काँग्रेसचे चौदावे मुख्यमंत्री भाजपमध्ये?

मध्य प्रदेशचे दिग्गज नेते आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही हातात कमळ घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर आहेत. कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ यांच्या एक्स, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंट्सवरून काँग्रेसचा लोगो गायब झाला आहे. त्यामुळे कमलनाथ कधीही भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

77 वर्षीय कमलनाथ हे मागील सहा दशकांपासून काँग्रेससोबत आहेत. ते तब्बल आठवेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. याशिवाय त्यांनी जवळपास 16 वर्षे केंद्रात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुराही देण्यात आली होती. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

काही दिवसांपूर्वी पार पडलेली मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लढवली होती. मात्र यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. भाजपने दोन तृतीयांश जागा जिंकत सत्ता स्थापन केली. त्यावेळी या पराभवाचे खापर कमलनाथ यांच्यावर फोडत त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आाला होता. तेव्हापासूनच ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ते पक्ष सोडतील असा अंदाज कोणत्याही काँग्रेस नेत्याने व्यक्त केला नव्हता.छिंदवाडा येथील त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक दिल्ली दौरा जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 18 नोव्हेंबर 1946 रोजी जन्मलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे शालेय शिक्षण उत्तराखंड (अविभाजित उत्तर प्रदेशचा भाग) येथील डेहराडून येथून झाले. यानंतर कमलनाथ यांनी सेंट झेवियर, कोलकाता येथून बी.कॉम केले. त्यानंतर 1968 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. कमलनाथ 1970 ते 1981 पर्यंत सुमारे 11 वर्षे अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य होते. दरम्यान, 1976 मध्ये त्यांच्याकडे उत्तर प्रदेश युवक काँग्रेसची धुराही आली. यानंतर 1979 मध्ये ते पहिल्यांदा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर ते 1984, 1990, 1991, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा भागही राहिले आहेत.

दरम्यान, कमलनाथ 1991 ते 1994 पर्यंत केंद्राचे वन आणि पर्यावरण मंत्री, 1995 ते 1996 पर्यंत वस्त्रोद्योग मंत्री आणि 2004 ते 2008 पर्यंत वाणिज्य आणि उद्योग मंत्री होते. 2009 ते 2011 पर्यंत त्यांनी रस्ते आणि वाहतूक मंत्रालय, तर 2012 ते 2014 पर्यंत त्यांनी नगरविकास आणि संसदीय कामकाज मंत्रीपद भूषवले मध्य प्रदेशचे दिग्गज नेते आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही हातात कमळ घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर आहेत. कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ यांच्या एक्स, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंट्सवरून काँग्रेसचा लोगो गायब झाला आहे. त्यामुळे कमलनाथ कधीही भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

77 वर्षीय कमलनाथ हे मागील सहा दशकांपासून काँग्रेससोबत आहेत. ते तब्बल आठवेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. याशिवाय जवळपास 16 वर्षे केंद्रात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुराही देण्यात आली होती. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

काही दिवसांपूर्वी पार पडलेली मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लढवली होती. मात्र यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. भाजपने दोन तृतीयांश जागा जिंकत सत्ता स्थापन केली. त्यावेळी या पराभवाचे खापर कमलनाथ यांच्यावर फोडत त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आाला होता. तेव्हापासूनच ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ते पक्ष सोडतील असा अंदाज कोणत्याही काँग्रेस नेत्याने व्यक्त केला नव्हता.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 18 नोव्हेंबर 1946 रोजी जन्मलेले कमलनाथ यांचे शालेय शिक्षण डेहराडून येथून झाले. संजय गांधी यांचे ते विश्वासू मानले जात.यानंतर 1979 मध्ये ते पहिल्यांदा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर ते 1984, 1990, 1991, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंत सलग नऊ वेळा खासदार होते.