राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सहा उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सातजणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी दाखल झालेला अपक्ष उमेदवाराचा सातवा अर्ज छाननीत बाद झाला आहे. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांनी अर्ज केले आहेत. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केले. 20 फेब्रुवारी ही उमेदवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यादिवशी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सातजणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. महायुती आणि महविकास आघाडी यांच्यात झालेल्या एकमतानुसार भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या गटाने उमेदवार दिला नव्हता.
या निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार रिंगणात उतरवेल अशी चर्चा होती. पण, भाजपने चौथा उमेदवार दिला नाही. पण, एक अपक्ष अर्ज आल्यामुळे ही निवडणुक रंगणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण, आता अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवल्यामुळे या निवडणूकीची बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
