सुनील तटकरे यांचे संकेत; बारामतीतून सुनेत्रा पवारच

बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच लढणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. कार्यकर्त्यांची सुनेत्रा पवार यांनीच लढावे अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले, महायुतीत बारामती मतदार संघाची मागणी करणार. हा मतदार संघ राष्ट्रवादी नेहमी जिंकत आला आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामतीची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. पक्ष आणि चिन्ह मिळालं. त्यानंतर झेंडाही मिळाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनेचा आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड, पुणे येथे कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी, पुणे, सांगली येथे बैठकांचे नियोजन केले आहे. २५ वर्षाच्या वाटचालीत जेवढे मेळावे झाले नव्हते, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आता मेळावे होतं आहे. असे मेळावे यापुढे होत राहतील. बूथ पातळीवर संघटनेचे काम सुरू आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगावाटपाचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते आणि अमित शाह घेतील. मात्र राष्ट्रवादीला किती जागा मिळतील याचे उत्तर त्यांनी दिले नाही. भाजप सोबत जाण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. २०१४, २०१७ आणि २०१९ ला पण भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाला होता. राजकारणात आम्ही फारच कमकुवत आहोत अस दाखवले जात आहेत. पवार साहेबांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची संधी सर्वानुमते घेतली होती. नैराश्य आलं की आपणचं कसे बरोबर सागितले जाते. सुप्रीम कोर्टाची चपराक कोणाला हे सर्वांना माहिती आहे. अदृश शक्ती कोण तुम्हीच शोधा असे तटकरे म्हणाले.