बीडमध्ये राष्ट्रीय दर्जाचं 65 कोटींचे क्रिकेट स्टेडियम उभारणार; धनंजय मुंडे यांची घोषणा

क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एखाद्या धर्माप्रमाणे क्रिकेटला मानणारे आणि या खेळाचा आनंद घेणारे करोडो चाहते भारतात आहे. इंडियन प्रीमिअर लीग तसेच देशातील अन्य स्पर्धांमुळे क्रिकेट बद्दल तरुण पिढीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या भारतात लहानपणापासूनच मुलांना क्रिकेटची आवड आणि प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नेहमी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. अशातच आता मंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा करत क्रिकेटप्रेमींच्या आनंदात भर घातली आहे. महाराष्ट्रातील परळी शहरात राष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम भारणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हंटल आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि युवराज सिंह हे सुद्धा उपस्थित होते.

‘नाथ प्रतिष्ठान’ आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर ही घोषणा केली गेली. परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयासमोर सुरू असलेल्या नामदार चषक स्पर्धेचा आज फायनल सामना होता. जेकेसीसी विरुद्ध जय श्रीराम या दोन संघात फायनल सामना झाला, यामध्ये जय श्रीराम संघाने हा सामना दोन विकेटने जिंकला. या सामन्यावेळी युवराज सिंग आणि जहीर खान उपस्थित होते.

युवराज सिंग, झहीर खान आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एक लाखाचे बक्षीस देऊन या टीमचं अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत उभारणार स्टेडियम 65 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू झहीर खान आणि युवराज सिंह यांनी या सामन्याला उपस्थिती लावली होती. झहीर खानने यावेळी मराठीमध्ये भाषण करत सर्व खेळाडूंना मेहनत करत राहा, असं आवाहन केलं.

आयपीएलच्या धर्तीवर बीपीएल देखील खेळवले जाणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली. ‘नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक वर्षी परळी शहरांमध्ये नामदार चषक टेनिस बॉल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तीन हजार खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सातशे खेळाडूंची पुढच्या वर्षी आयपीएलच्या धर्तीवर पीपीएलमध्ये बोली लावली जाणार, असं धनजंय मुंडे यांनी सांगितलं.

मी देखील ग्रामीण भागातून टेनिस बॉल पासून क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली. हळूहळू संधी उपलब्ध होत गेली आणि देशासाठी खेळायची मला संधी मिळाली. ग्रामीण भागाच्या मातीतूनच योग्य वेळी योग्य संधी मिळाल्याने मोठे खेळाडू निर्माण होत असतात. त्यामुळे माझे मित्र धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी स्थानिक प्रतिभावान खेळाडूंना योग्य मंच उपलब्ध करून दिल्यानेच ग्रामीण मातीतून युवराज सिंग आणि झहीर खान सारखे खेळाडू घडत असतात असे गौरव उद्गार भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी काढले.