युद्धस्य कथा रम्यच नव्हे तर प्रेरणादायीही असतात. भारताच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्याचे अखंड व्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहे.तेरा हजार फुटांवरील जगातील सर्वात लांब दुहेरी बोगदा निर्माण करून चीन सीमा सुरक्षित केली आहे. या बोगद्याला नावही प्रेरणादायी दिले आहे. सेला टनल हे एका उदात्त लव्ह स्टोरीचे चिरंतन स्मारक ठरणार आहे. या बोगद्याच्या लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
एका शूर भारतीय जवानाची ही लव्ह स्टोरी. पण खूप आगळी वेगळी. या शूर जवानासोबतच त्याच्या प्रेयसीनेही चीन्यांशी लढताना आपला देह अर्पण केला. प्रेयसी अन् तोदोघेच सीमेवर लढत होते. पण चिनी समजले संपूर्ण बटालियन आपल्या विरुद्ध लढते आहे. काय होती ही लव्ह स्टोरी? 1962 मधील नोव्हेंबर महिन्यात भारत आणि चीन युद्ध सुरू होऊन २७ दिवस उलटून गेले होते. चिनी सैनिकांनी तवांग सेक्टरवर हल्ले वाढविले. भारतीय लष्कराच्या गढवाल रायफल्सची चौथी बटालियन चांगमधील खिंडीच्या 20 कि. मी. वरील खर्सा ओल्ड क्टरमध्ये तैनात करण्यात आली होती.
चिनी लष्कर अद्ययावत शस्त्रास्त्रांसह शिरले. चिन्यांच्या हल्ल्यात डवाल रायफल्सचे बहुतांश सैनिक हुतात्मा झाले. जसवंतसिंह रावत हे या बटालियनमधील एक रायफलमॅन. 10 हजार फूट उंचीवर ते लढत होते आणि सोबतीला प्रेयसी सेला होती,सेला स्थानिक मोनपा जमातीची. जसवंतसिंह यांची या भागात पोस्टिंग असताना त्यांची ओळख झाली. एका प्रेम कहानी सुरुवात झाली. भविष्याची गोड स्वप्न ते पाहत होते. पण त्याच वेळी चीनने भारतावर हल्ला केला. लढताना जसवंतसिंह यांची संपूर्ण बटालियन धारातीर्थी पडली. जसवंतसिंह यांनी एकट्याने चिनी सैन्याचा सामना करण्याचे ठरविले. पण सेला म्हणाली, मीही मातृभूमीसाठी तुझ्यासोबत चिन्यांशी लढेन.’ गुरा ही आणखी एक स्थानिक तरुणी सेलाची मैत्रीण होती. तीदेखील लढणार’ म्हणून हट्टाला पेटली. दोघी जणींना परिसराची इत्थंभूत माहिती होती. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी रायफल्स लावल्या. जसवंत एका ठिकाणावरील रायफल वापरून झाली, की दुसऱ्या ठिकाणी शिताफीने जात आणि तेथून मारा करत. मग तिसऱ्या ठिकाणी जाऊन तेथून गोळ्यांचा वर्षावर करत. त्यामुळे चिनी सैनिकां समजलेच नाही की कुणीतरी एकटा जवान लढतोय. जसवंत यांनी एकट्याने 300 चिनी सैनिक ठार केले. चिनी सैन्याने त्यांना वेढा घातला. सेला ही चिन्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात शहीद झाली. नुरा चिन्यांच्या तावडीत सापडली.
चिन्यांच्या हातात सापडण्यापेक्षा जसवंत यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. तरीही क्रूर चिन्यांनी जसवंत यांचा शिरच्छेद केला. जसवंत यांचे शिर भारताला कापून नेले. जसवंत सिंह यांचा आत्मा आजही भारताच्या पूर्व सीमेचे रक्षण करतो, अशी भारतीय जवानांची श्रद्धा आहे. आज या ठिकाणाचे नाव जसवंतगड’ आहे आणि बोगद्याचे नावही जसवंत सिंह च्यासोबत शहीद झालेल्या त्यांच्या ‘सेला’ या प्रेयसीच्या तावरून ठेवण्यात आले आहे.
भारतीय सैन्याच्या शौर्याची ही कहाणी. पण काँग्रेसच्या सरकारांनी सीमेवरील सुरक्षेकडे कसे दुर्लक्ष केले याचेही उदाहरण आहे. इटानगर ते तवांग हा रस्ता बर्फवृष्टीमुळे वर्षातील 7 महिने बंद राहत होता. 448 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी १२ तासापेक्षा जास्त वेळ लागत होता. त्यामुळेच चीनसोबत युद्धात भारताला लष्करी कुमक पाठविणे शक्य झाले नव्हते. तरीही त्यावेळच्या पंडित नेहरू सरकारपासून नंतरच्याही काँग्रेस सरकारांनी लक्ष दिले नाही. सीमांवरील सुरक्षा कडेकोट करण्यासाठी काम करणाऱ्या मोदी सरकारने शिवधनुष्य पेलले. 1962 मध्ये चीनने आक्रमण केले. भारताचा पराभव झाला. तसे पुन्हा घडू नये म्हणून केंद्राने सेला बोगदा बांधला. कोणत्याही ऋतूत एलएसीवर वाढीव कुमक, रसद आता पोहोचविता येईल. चीनकडून गडबड झाल्यास वाढीव कुमक, रसद आपण आता मिनिटांत पाठवू शकू. या बोगद्यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणि मनोबल वाढले आहे आणि चीनचे टेन्शन वाढले आहे! 2022 मध्ये केंद्र सरकारने ईशान्येकडील पायाभूत सुविधा मजबुतीकरणाला वेग दिला. इटानगर ते तवांग हा मार्ग या बोगद्यामुळे आता 12 महिने खुला झाला आहे. एका उदात्त प्रेमकथेचे चिरंतन स्मारक मोदी सरकारने उभारले आहे.
