अरूणाचल प्रदेशवर आपला दावा ठोकण्याच्या आणखी एका प्रयत्नात चीनने भारतातील पूर्वोत्तर राज्यामध्ये एलएसीसोबत विविध ठिकाणच्या ३० नव्या स्थानांची चौथी यादी जाहीर केली. परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे दावे फेटाळून लावत म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. हे पहिल्यांदाच घडलेले नाही की चीनने भारतीय क्षेत्रातील ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे सोमवारी चीनने अरुणाचल प्रदेशावर आपला दावा केल्याच्या दाव्यावरून वक्तव्य समोर आले. ते म्हणाले, “आज मी एखाद्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश हे भारताचे राज्य नेहमीच होते, आहे आणि राहील. नाव बदलल्याने काही फरक पडणार नाही.” खरे तर, सोमवारी चीनने अरुणाचल प्रदेशातील ३० ठिकाणांची नावे बदलून आपला भाग असल्याचा दावा केला होता. यामध्ये 11 रहिवासी क्षेत्रे, 12 पर्वत, 4 नद्या, एक तलाव आणि डोंगरातून निघणारा एक मार्ग यांचा समावेश आहे.
यावेळी चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘झांगनान’च्या भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली आहे. अरुणाचल प्रदेशचे हे चिनी नाव आहे. चीन यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करत आहे. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदेशासाठी 30 इतर नावे पोस्ट करण्यात आली आहेत.2017 मध्ये बीजिंगने अरूणाचल प्रदेशातील सहा जागांसाठी स्टँडर्डाईज्सत नावांची प्रथम यादी जाहीर केली होती. यानंतर 2021 मध्ये 15 स्थानांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर 2023 मध्ये 11 अतिरिक्त स्थानांची एक यादी जाहीर करण्यात आली होती
