लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ-वाशिम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल 2024 ही असून या मतदारसंघांसाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होईल.
कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज दाखल झाले होते?
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा 29 उमेदवारांचे 42 अर्ज, अकोला 28 उमेदवारांचे 40, अमरावती 59 उमेदवारांचे 73, वर्धा 27 उमेदवारांचे 38, यवतमाळ- वाशिम 38 उमेदवारांचे 49, हिंगोली 55 उमेदवारांचे 78, नांदेड 74 उमेदवारांचे 92 आणि परभणी 42 उमेदवारांचे 65 अर्ज दाखल झाले होते.
दरम्यान उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.
