मतदार अन् लोकशाही लग्न, पुणे शहरातील अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. मतदान करण्यासाठी आणि मतदानात वाढ व्हावी यासाठी शासनपातळीवर आणि सामाजिक संघटनांकडून विविध माध्यमातून जनजागृती करणे सुरू आहे. अशातच पुण्यामध्ये सध्या एक विवाह निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे.

13 मे रोजी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी ही निमंत्रण पत्रिका असून 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण देण्यात आलं आहे.लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा देशाच्या नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे.

भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव मतदार आहे. त्याचा विवाह भारतीय संविधानाची जेष्ठ सुकन्या लोकशाही हिच्याशी विवाह होणार आहे. वैशाख शु. 12 सोमवार 13 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या शुभ मुहूर्तावर लोकसभा 2024 च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठवण्यासाठी आपल्या एक एक मतदान रुपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा हेची निमंत्रण अगत्याचे, असे या लग्न पत्रिकेत म्हटले आहे.

मतदान करण्याचे आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे.या दोघांचा शुभविवाह 13 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या शुभमुहूर्तावर होणार आहे, असा उल्लेख लग्नपत्रिकेत केला आहे.या अनोख्या लग्नाचे निमंत्रण आम्ही भारताचे लोक यांनी दिले आहे. आपले मतदान हाच आमचा आहेर अण् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट असणार आहे, असे या पत्रिकेत म्हटले आहे.