लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह महायुतीतील सर्वच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठिकठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. कोल्हापूर येथे पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेवर पलटवार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरे यांची चौकशी, विचारपूस करायचे, असे म्हटले आहे.
चंदगड मतदारसंघात लोकांचा चांगला प्रतिसाद असून देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचं मन लोकांनी बनवले असल्याचे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करत त्यांनी “मोदी देशासमोरच संकट नसून त्यांच्यासमोरच संकट आहे,” असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. “चंदगड मतदार संघात लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे लोकांनी देशात मोदींना पंतप्रधान बनवण्याचं मन बनवलेले आहे. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा निर्णय हा लोकांचा झालेला आहे.” उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “मी जें बोललोय ते सत्य बोललोय वारंवार बोलण्याची गरज नाही. मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे. देशा समोरच संकट मोदी नाहीत मात्र त्यांच्या समोरच आणि त्यांच्या पक्षासमोरचं संकट मोदी आहेत. पंतप्रधान मोदींवर देशाचं प्रेम आहे. शरद पवार जें बोलले त्याचे उत्तर मतदार जनता मतपेटीतून देईल.”
संभाजीराजे यांचा राज्यसभेच्या निवडणुकी वेळी अवमान केला. भाजीराजे यांना अटी आणि नियम घालून लिहून घेणे हे चुकीचे. एकीकडे छत्रपती घराण्याचा सन्मान दाखवायचा आणि दुसरीकडे असे लिहून घेणे हे चुकीचं असल्याची टीका त्यांनी केली. ही निवडणूक महत्वाची आहे. पुढील 5 वर्षे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. पर्याय 2 आहेत 1 मोदी जी आहे, वेगवेगळे पक्ष एकत्र करून आपण महायुती केली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या कडे 26 पक्षाचे खिचडी आहे. मोदी यांची विकासाची गाडी आहे तर राहुल गांधी यांच्याकडे इंजिन आहे पण डब्बे नाही आहेत.अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल.
