अनेक दिवस चालढकल केल्यावर राहुल गांधींची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे. राहुल यंदा अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. तर अमेठीतून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे राहुल गांधी आज दुपारीच अर्ज भरणार आहेत.
अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो.या जागांवर पारंपारिकपणे गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतात. मात्र, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेलीची जागा खाली झाली आहे. तर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधीचा पराभव केल्यानंतर ही जागाही काँग्रेसला गमवावी लागली आहे.अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो.या जागांवर पारंपारिकपणे गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतात. मात्र, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेलीची जागा खाली झाली आहे. तर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधीचा पराभव केल्यानंतर ही जागाही काँग्रेसला गमवावी लागली आहे.
मागच्यावेळी राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड आणि अमेठीमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते अमेठी मधून पराभूत झाले होते. आता सुद्धा ते दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. एक म्हणजे वायनाड आणि दुसरा रायबरेली. राहुल गांधी हे अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. अमेठीमधून किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कदाचित पराभवाच्या शक्यतेचा मुद्दा लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील राहुल गांधी यांचा परंपरागत मतदारसंघ बदलला असावा. त्यांना सुरक्षित सीट म्हणून रायबरेलीमधून उमेदवारी देण्यात आली असावी. रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी 2004 पासून 2019 पर्यंत सातत्याने खासदारकीची निवडणूक जिंकली आहे.
