छत्रपतींच्या वंशजाविरोधात उमेदवार का दिला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल

सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील पाटणमध्ये भाजपची जाहीर सभा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी शरद पवार यांच्या सभा होत आहेत. यावेळी शरद पवार नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांची छान पध्दत आहे. सगळ भाष्य करायचं अन् मग म्हणायचं भाष्य करणार नाही. पण त्यांनी करावं कारण नरेंद्र मोदीचं जीवन खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. जे मोदीवर बोलतील त्याच्यावरच भाष्य उलटेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना साताऱ्याची शान व अभिमान असलेली खासदार उदयनराजे हे त्यांच्यासोबत दिसले पाहिजेत. कोल्हापूरात शाहू महाराजांना बिनविरोध द्यायला हवे होते, असे शरद पवार शरद पवार सांगत आहेत. मग, साताऱ्यात छत्रपतींच्या वंशजाविरोधात उमेदवार का दिला? किमान उदयनराजेंच्या तोडीचा तरी उमेदवार त्यांनी द्यायला हवा होता. ज्याने शौचालयात पैसे खाल्लेत असा उमेदवार शरद पवार यांनी दिला आहे. खासदार उदयनराजे त्यांच्या तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबणार नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

खासदार उदयनराजे त्यांच्या तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबणार नाहीत. त्यामुळे ही निवडणूक आम्ही सातारकरांच्या भवितव्यावर सोडली असून, साताऱ्याच्या छत्रपतींच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार करून छत्रपतींच्या वंशजांना दिल्लीला पाठवा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील निर्धार मेळाव्यात केले. महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावरील निर्धार सभेत ते बोलत होते.

राहुल गांधीची यांच्यासोबत 24 पक्षांची खिचडी आहे. आपल्य़ा विकासाच्या ट्रेनचं इंजिन मोदीजी आहेत. मोदींना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आहे. उदयनराजे यांना मत म्हणजे मोदींना मत, 140 कोटी लोकांना मोदींनी कोरोना लस मोफत दिली. कराड चिपळूण रेल्वे ची मागणी नक्की मान्य होईल, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी सातारकरांना दिलं आहे.