तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. देशभरात तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील ९५ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुती आणि मविआच्या दिग्गज नेत्यांनी या ११ मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला होता. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीसुद्धा आपल्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावला होता तर मविआच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांनी प्रचाराचा जोर लावला होता. आज अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ७ तारखेला मतदान पार पडणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघांत ७ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. संध्याकाळी सहा वाजता जे मतदार मतदानकेंद्राच्या परिघात उपस्थित असतील त्यांना रात्री कितीही वाजले तरी मतदान करता येणार आहे. राज्यात वाढत्या उन्हाच्या चटक्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. मतदान केंद्रात मंडप, पिण्याचे पाणी, ओआरएसची पाकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ –
बारामती हा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. बारामती मतदारसंघाकडे राज्य, देशाचे आणि जगाचेही लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर वयाच्या 84 व्या वर्षात असलेले शरद पवार ज्या तडफेने उभे राहिले, ते थक्क करणारे आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी नणंद- भावजयीची लढत होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादांच्या सख्ख्या भावासह संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या मागे एकवटले आहेत.
११ मतदारसंघात या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
१.बारामती
महाविकास आघाडी- सुप्रिया सुळे
महायुती- सुनेत्रा पवार
२. रायगड
महायुती- सुनील तटकरे
महाविकास आघाडी – अनंत गीते
३. उस्मानाबाद
महाविकास आघाडी- ओमप्रकाश राजे निंबाळकर
महायुती- अर्चना पाटील
४. लातूर
महाविकास आघाडी- शिवाजीराव काळगे
महायुती- सुधाकर शृंगारे
५. सोलापूर
महाविकास आघाडी- प्रणिती शिंदे
महायुती- राम सातपुते
६. माढा
महाविकास आघाडी- धैर्यशील मोहिते पाटील
महायुती- रणजितसिंह नाईक- निंबाळकर
७. सांगली
महाविकास आघाडी- चंद्रहार पाटील
महायुती- संजयकाका पाटील
अपक्ष – विशाल पाटील
८. सातारा
महाविकास आघाडी- श्रीनिवास पाटील
महायुती- उदयनराजे भोसले
९. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
महाविकास आघाडी- विनायक राऊत
महायुती- नारायण राणे
१०. कोल्हापूर
महाविकास आघाडी- शाहू छत्रपती महाराज
महायुती- संजय मंडलिक
११. हातकणंगले
महाविकास आघाडी- सत्यजित पाटील
महायुती- धैर्यशील माने
स्वाभिमानी शेतकरी संघटना- राजू शेट्टी
