अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन आणि काँग्रेसच्या नेत्या राधिका खेडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या दोघांनी प्रवेश केला आहे. शेखर सुमन यांची राजकारणातील ही दुसरी इनिंग आहे. या पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राजकारणापासून दूर होते. आता नव्याने पुन्हा त्यांनी राजकारणात उडी घेतली आहे.अभिनेते शेखर सुमन यांच्याबरोबरच काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक राधिका खेडा यांनीही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी छत्तीसगढ काँग्रेस प्रचार विभागाचे चेअरमन सुशील आनंद शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप करत काँग्रेसला राजीनामा दिला होता.

राजीनामा दिल्यानंतर राधिका खेडा यांनी आपल्या मनातील वेदनाही बोलून दाखवल्या होत्या. काँग्रेस रामविरोधी, सनातन विरोधी आणि हिंदू विरोधी असल्याचं मी ऐकलं होतं. पण मी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. महात्मा गांधी त्यांच्या मिटिंगची सुरुवातच रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणून करायचे. पण मी माझ्या आज्जीसोबत अयोध्येला गेले. त्यानंतर घरी आल्यावर माझ्या घरावर मी जय श्रीरामचा झेंडा लावला. त्यानंतर काँग्रेसचे नेते माझा तिरस्कार करू लागले. तेव्हा मला काँग्रेसचं सत्य समजलं. मी हे झेंडा लावल्याचे फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे मला तसं केल्याबद्दल ओरडा खावा लागला होता. निवडणुकीच्या काळात अयोध्येला का गेली? असा सवालही मला करण्यात आला होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.

अभिनेते शेखर सुनम याआधी काँग्रेसमध्ये होते. 2009 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पटना साहिब येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात ते उभे राहिले होते. पण त्यांचा पराभव झाला होता.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, मी देवेद्रं फडणवीस आणि बावनकुळे यांचे आभार व्यक्त करतो. २०१८ ची निवडणूक चुरशीची झाली. उद्धव ठाकरेंनी तेव्हा मागणी केली होती की, पालघरची जागा आम्हांला पाहिजे. आता मी शिंदे गटातून खासदार म्हणून काम केलं आहे. आता फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. आज मी घरवापसी करत आहे. याचा आनंद होत असल्याचं म्हणत गावित यांनी मुख्यमंत्र्यांना देखील धन्यवाद व्यक्त केले आहेत.