प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी टॉपवर, आत्तापर्यंत 83 सभा; प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

देशातील निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवट दिवस आहे. त्यामुळे, सर्वच दिग्गज नेतेमंडळी प्रचारासाठी उमेदवारांच्या मतदारसंघात तळ ठोकून आहे. महाराष्ट्रात 4 थ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान होत असून देशभरातील विविध राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यामुळे, देशपातळीवरील नेतेही प्रचारसभांचे दौरे कर आहेत. पहिल्या तीन टप्प्यातील प्रचारसभांची आकडेवारी पाहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वाधिक सभा घेऊन रेकॉर्ड केला आहे. पहिल्या 3 टप्प्यात मोदींनी तब्बल 83 सभा घेतल्या आहेत. त्यामुळे, प्रचारसभांच्या रणधुमाळीत मोदींचा पहिला नंबर लागतो.

31 मार्च ते 5 मे या तीन टप्प्यातील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचार सभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. 83 निवडणूक सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना खूप मागे टाकले आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 83 निवडणूक सभा आणि रोड शो मध्ये सहभाग घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह 66 निवडणूक सभा आणि रोड शो सह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 40 निवडणूक सभांना संबोधित केले तर प्रियंका गांधी यांनी 29 निवडणूक सभांना संबोधित केले.

31 मार्च ते 5 मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. 83 निवडणूक सभा घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना खूप मागे टाकले आहे. दरम्यान, 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी 13 मे रोजी त्यांच्या विशाल ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आहेत. मोदी यांच्या उमेदवारीसाठी 25 ते 30 समर्थकांची नावे निश्चित करण्यात आले आहेत त्यामध्ये विविध जाती जमातींचे लोक आहेत. त्यांना समर्थक बनवून मोदी हे कोणत्याही एका जाती धर्माचे नसून त्यांना सर्व जाती धर्माचा पाठिंबा मिळत आहे असा संदेश दिला जाणार आहे.पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते वाराणसीला पोहोचणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही वाराणसीला जाणार आहेत.