महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला.
मुलींचा निकाल ९५.४४ टक्के तर मुलांचा निकाल ९१.६० टक्के इतका लागला आहे. ३.८४ टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त असल्याने या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं दिसतंय. एकूण १३ लाख ८७ हजार १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही इयत्ता बारावीचा निकाल https://www.tv9marathi.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन पाहू शकता. mahresult.nic.in, mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवरही पाहू शकणार आहात.
बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. राज्यात ९ विभागीय मंडळ मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. तर २६ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोकण विभाग : 91.51 टक्के
पुणे विभाग : 94.44 टक्के
कोल्हापूर विभाग : 94.24 टक्के
अमरावती विभाग : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर विभाग : 94.08 टक्के
नाशिक विभाग : 94.71 टक्के
लातूर विभाग : 92.36 टक्के
नागपूर विभाग : 93.12 टक्के
मुंबई विभाग : 91.95 टक्के
