विशेष प्रतिनिधी



नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौहार्दाचे दर्शन घडवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज सर्वांची मने जिंकली. वयोमानामुळे थकलेल्या शरद पवार यांना शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली. पंतप्रधानांच्या या कृतीला दाद देत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
( Prime Minister’s cordiality won hearts, gave support to Sharad Pawar)
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसले होते. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना खुर्चीवर मदत केली. एवढंच नव्हे तर आदराने पाण्याचा ग्लास देखील भरून दिला. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या कार्यक्रमात आधी शरद पवार यांनी भाषण केलं. भाषण केल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावरील आपल्या खुर्चीवर येऊन बसले. खुर्चीवर बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: बाटलीतील पाणी ग्लासात घेऊन शरद पवार यांना दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे सर्वांनी कौतुक केलं आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
