विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मातोश्रीवर दक्षिणा दिल्याशिवाय पदे किंवा उमेदवारी मिळत नाही असे आरोप नेहमी केले जातात. एकेकाच्या ठाकरेंच्या निकटवर्तीय असलेल्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीच आता याबाबत आरोप केले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की पदे मिळायची असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ( Dr. Neelam Gorhe revealed the modus operandi of Thackeray’s Shiv Sena. Give two Mercedes and you will get post.)
दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या केला आहे. डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या.त्या म्हणाल्या, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची.ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असेही त्या म्हणाल्या.
मातोश्री कडून पैसे घेतल्याचे आरोप नवीन नाहीत. उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा पदे वाटण्यासाठी शिवसैनिक पैसे द्यावे लागत असे आरोप नेहमी होतात. मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर हे खोके घेऊन जात होते, असा आरोप शिंदे गटाचे खासदार आणि विद्यमान मंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता.
मातोश्री’वर आम्हाला पैसे पाठवावे लागत होते हे खरंय. शिवसैनिकांनी सदस्य शुल्कापोटी दिलेले ५० कोटीदेखील यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वाहा केले, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.
डॉ. गोऱ्हे यांच्या आरोपाना उत्तर देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की,
नीलम गोऱ्हे आमच्या पक्षात खूप काळ राहिल्या आहेत. 30 वर्षे त्यांनी आमच्या पक्षात काम केलं. नीलम गोऱ्हे यांनी जे आरोप केलेत, त्यात काही तथ्य असेल, तर सर्वात जास्त कमाई नीलम गोऱ्हे यांनीच केली असावी. नीलम गोऱ्हे मातोश्रीवर कायम पडीक असायच्या. फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत आणि मातोश्रीवर कधी कोणी जावं, कोणाला भेटायला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचं, कोणाला पद द्यायचं नाही, प्रवेश सुद्धा, सगळं त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल. खरंतर, त्यांचा वार्षिक कमाईचा एवरेज किती आहे हा विचारायला पाहिजे होता.
गोऱ्हेंची नमकहरामी आहे, असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही, असे त्यांनी सांगितले.
