कबरीवर बोर्ड लावा, मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथे गाडला ..राज ठाकरेंची भूमिका

विशेष प्रतिनिधी 
 
मुंबई : मराठेशाहीच्या शौर्याची प्रतिके नष्ट करून चालणार नाहीत. ती जगाला दाखवायला पाहिजेत. सजवलेली कबर काढून टाका आणि तिथे एक बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथे गाडला, अशी  भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली. ( Put Up a Board: Aurangzeb, Who Came to Destroy Marathas, Was Buried Here ,Raj Thackeray’s Stand)
औरंगजेबाची कबर काढावी, अशी मागणी सध्या होत आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, औरंगजेब बादशाह याचे राज्य कुठपासून कुठपर्यंत होते. आफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत आणि बंगालपर्यंत होते. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटले अन् महाराष्ट्रात परत आले, त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. औरंगजेबाचा एक मुलगा महाराज गेल्यावर दक्षिणेत आला. त्या मुलाला राहायला जागा संभाजीराजे यांनी दिली. त्याला बरोबर घेतले. हा इतिहास वाचला गेला पहिजे. १६८१ ते १७०७ म्हणजे २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता. संभाजीराजांबरोबर लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारले. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या. औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण जमले नाही. सर्व प्रयत्न केले आणि तो मेला. जगभरातील लोकांना कळते तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे शिवाजी महाराजांचे नाव येते. आता औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे. त्या ठिकाणी मोठा बोर्ड लाव. आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला.
औरंगजेब हा आमचा इतिहास आहे. इतिहास कशासाठी वाचायचा. इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान आला. प्रतापगडावर मारला गेला. तिथेच त्याची कबर खोदली गेली. पुरून उरीन जो शब्द आहे ना तो हा आहे. शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय त्याला पुरला नसेल. त्याची कबर केली ते महाराजांनी सांगितले असेल. जगाला कळू द्या कुणाला मारायला आला अन् काय झाले. मराठ्यांनी ज्यांना गाडले त्याची प्रतिके नष्ट करून चालणार नाही. जगाला कळले पाहिजे आपण त्यांना गाडले, असेही राज ठाकरे यांनी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *